पुस्तकांची काही पानं मोरपिसांनी नटतात
काही गुलाबाच्या फुलांनी सजतात,
काही पुस्तकांच्या नशीबी पिंपळाची पानंच येतात.
ती पानं मग त्या पुस्तकांच्या प्रारब्धानुसार
कधी नुस्ती शेंगांच्या पुडीसोबतची पाठवण होतात
कधी थोड्याकाळापुरतीची सुंदर मंद सुगंध देणारी आठवण होतात
काही पानं तुमच्या आमच्या सहवासात हळुहळु म्हातारी होतात आणि आयुष्यभराची नक्षीदार साठवण होतात..
छान. उत्तम लिखाण
ReplyDeleteधन्यवाद !!
Delete