संसाराच्या हिशेबचक्रात
कधी saving कधी spending असतं
आज झालंच borrowing तर उद्या
हमखास lending असतं ||
एकमेकांनां समजून घेणं
हे ह्या नात्यात binding असतं
आज झालच ego ला hurt
तर उद्या हळुवार mending असतं ||
आपला point सर करण्यापेक्षा
गप्प ऐकणं पण एक skill असतं
roller - coaster पेक्षा ही जास्त
कधी -कधी मौनात thrill असतं ||
आणि मागे वळून बघताना
जोडीने mistakes वर खो-खो हसायचं असतं
असं बघा म्हटलं तर सगळंच high -stakes असतं
आणि म्हटलं तर piece of cake असतं ||
Bharich👍
ReplyDeleteधन्यवाद जैशा
ReplyDelete